२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

24 प्राईम न्यूज 21 Nov 2023 राज्य पोलीस दलातील २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी सायंकाळी गृह विभागाने अंतर्गत बदल्या केल्या असून त्यात पोलीस उपायुक्त- पोलीस अधीक्षक
दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

बदल्या झालेल्यांमध्ये नागपूरचे पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी यांची अमरावती ग्रामीण, धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमी, पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळे, जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबईचे पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांची सोलापूरग्रामीण, नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम महादेव साळी यांची अमरावती, अमरावतीचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची वाशिम, धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक नवनीतकुमार कॉवत यांची छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची मुंबई राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ, गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिकच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार (कांगणे) यांची पुणे लोहमार्ग, जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची नाशिक गुप्तचर प्रशिक्षण शाळा येथे बदली करण्यात आली आहे.