एरंडोल शहरात धाडसी घरफोडी : पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास..

0

एरंडोल/प्रतिनिधि

एरंडोल घर बंद असल्याची संधी चोरटे साधत असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली

आहे. लग्नानिमित्त कुटूंब बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील कागदीपुर्यात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील कागदीपुरा भागात किराणा व्यावसायीक खालीक अहमद रफिक अहमद (३९) हे कुटूंबासह वास्तव्याला आहेत. अमरावती येथे लग्न असल्याने कुटूंब लग्नासाठी गावी गेल्याने १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी संधी साधत घराच्या मागील दरवाजाला होल करीत कडी उघडून घरात प्रवेश केला. दोन लाख ३८ हजार ६४२ रुपये किंमतीचे एकूण ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे हार, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्यातील रींगा व अडीच लाखांची रोकड असा एकूण चार लाख ८८ हजार ६४२ रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी भेट देत पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!