डॉ. सय्यदना यांना ‘निशान-ए-पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात येणार..

24 प्राईम न्यूज 24 Nov 2023
दाऊदी बोहरा पंथाचे प्रमु
डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना ‘निशान-ए- पाकिस्तान’ हा पुरस्कार मिळविणारे ते चौथे भारतीय आहेत. डॉ. सैफुद्दीन यांच्या सेवेची दखल

घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी गुरुवारी केली. मात्र, पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निशान- ए-पाकिस्तान’ने गौरविण्यात आलेले मोरारजी देसाई (१९९०) पहिले भारतीय होते. १९९८मध्ये अभिनेता दिलीप कुमार यांना ‘निशान-ए- इम्तियाज’ पुरस्कार देण्यात आला होता. २०२० मध्ये काश्मिरी फुटीरतावादी नेते अली गिलानी यांना ‘निशान-ए- पाकिस्तान’ प्रदान करण्यात आला होता.