शेतातून वेचलेला कापुस चोरनार्यांच्या मुसक्या आवळल्या.. मारवड पोलिसांची कारवाई.

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुकयातील मारवड येथील शेतकरी शरद विक्रम धनगर

वय 39 वर्ष घंदा शेती रा. निम ता.अमळनेर यांचे शेतातून दिनांक 23/11/2023 रोजी दुपारी 03.20 वाजेच्या सुमारास 1) 4000/-रु.कि.अं.कपाशीची पिवळी 01 गोणी 50 किलो वजनाची अंदाजे 2) 4000/-रुकि.अं.ची कपाशीची 01 गोणी 50 किलो वजनाची अंदाजे साक्षीदार पुंजु शिरसाठ यांची मालकीची 3) 4000/-रुकि.अंधी कपाशीधी 01 गोणी 50 किलो वजनाची अंदाजे साक्षीदार लादू टोल चौधरी यांची मालकीची असे एकूण 12000/- रू कि. 03 गोण्या 150 किलो वजनाचे अंदाजे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले बाबत फिर्याद दिल्याने मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक/3182 मुकेश साळुंखे, पो काँ/अनिल राठोड, पो कॉ/राजेंद्र पाटील, पो हवा/फिरोज बागवान, पो कॉ.गुलाब महाजन, पो कॉ/तुषार वाघ यांनी CCTV फुटेज चे तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) सुरेश देविदास भिल (मोरे) वय 31 वर्षे 2) भोला हिरामण हाके वय 26 वर्षे 3) अशोक बुधा गायकवाड वय 26 वर्षे सर्व रा.ढढाणे ता.जि.धुळे यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.तरी सदर शेत मालाची चोरी करणाऱ्या चोरांना मारवड पोलीसांना अवघ्या काही तासात पकडुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक केल्याने मारवड परिसरातील शेतकरी व नागरिक यांनी मारवड पोलीसांचे अभिनंदन केले आहे.