फिरायला नेले नाही म्हणून पत्नीने लगावला ठोसा, पतीचा मृत्यू..

0

24 प्राईम न्यूज 25 Nov 2023

फिरायला नेले नाही, महणून पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे, ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या

दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे. निखील पुष्पराज खन्ना (३६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाच असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (३८) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे. घरगुती भांडणातून झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला, वानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले, त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना कळवले. मयत निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल, पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!