महायुतीत धुसफूस
मराठा-ओबीसी वाद : भुजबळांची राजीनाम्याची तयारी..

24 प्राईम न्यूज 25 Nov 2023 मनोज जरांगे-पाटील आणि आ. बच्चू कडू यांनी

मंत्री छगन भुजबळांवर आरोपाची तोफ डागल्यानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्येही धुसफूस वाढली आहे. मंत्री भुजबळही आपल्या भूमिकेवर ठाम असून प्रसंगी मंत्रिपदावर पाणी सोडण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे राज्यात आरक्षणाचा संघर्ष वाढत असताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ आधल्या भूमिकेवर ठाम असून, आपला ओबीसीसाठीचा लढा कायम राहील, त्यासाठी जर भाजप नेते किंवा मुख्यमंत्री आणि पक्षाध्या ज्येष्ठ नेत्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितला, तर आपण राजीनामा देऊ. प्रसंगी आमदारकीचाही राजीनामा देण्याची तयारी आहे. असे सांगत भुजबळ यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे भविष्यातही जरांगे-पाटील आणि भुजबळ यांच्यातील मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत. यातून महायुतीतदेखील घुसफूस वाढू शकते..