राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

24 प्राईम न्यूज 24 Nov 2023
केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई

भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान आठशे ते अधिकाऱ्यांच्या पगारात सहा ते आठ हजार रुपये वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वित्त विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या आधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी संघटनांची बैठक झाली होती. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलैपासून ४ टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने केली होती.