अ.भा क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवक संघटना यांचा वतीने स्वमि विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

एरंडोल (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद जयंती( युवा दिवस) जळगाव जिल्हा युवक संघटनेने एरंडोल येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी सर्व प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पन जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी च्या हस्ते करण्यात आले व संत नामदेव महाराज, मॉ साहेब जिजाऊ यांचा प्रतिमेच पुजन शहर अध्यक्ष संजय ईसई यांचा हस्ते करण्यात आले .दि १२ जानेवारी हा युवा दिनीनाचे अवजित्य साधुन जळगाव जिल्हा युवक संघटनेने *“युवा जोडो अभियानाची”-* सुरुवात एरंडोल शहरातून करण्यात आली या “युवा जोडो अभियान नोंदणीचा शुभारंभ एरंडोल येथील युवक मा.परेशजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा युवक सचिव निलेश जगताप यांनी संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली…जिल्हा युवक अध्यक्ष व इतर युवकानी स्वानी विवेकानंद यांच्या जिवना विषई त्यांचे विचार मांडले व ” युवा जोडो अभियांनाचा”माध्यमाने संपूर्ण जळगाव जिल्हात शिंपी समाज युवक संघटना यांचा माध्यामातुन सर्व युवकांना एकसंघ संघटित करण्याचे काम करणार असल्याचे सचिव निलेश जगताप यांनी सांगीतले या कार्यक्रमास कार्यालय प्रमुख शुभम शिंपी, तालुका युवक अध्यक्ष सोनू शिंपी, राज शिंपी केतन शिंपी, भैय्या शिंपी,जयश शिंपी.कल्पेश शिंपी. इ .युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते…