घरफोडी करणारे गुन्हेगार फिल्म इस्टाईल पाठलाग करत केले जेरबंद. -स्थानिक गुन्हे धुळे शाखेची कारवाई..

0

धुळे /अनिस खाटीक तक्रारदार नामे मिलींद यशवंतराव देसले, वय – ५५ रा. अनमोल

नगर देवपुर धुळे यांनी तक्रार दिली की, दि. १९/११/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वा. ते दि. २१/११/२०२३ रोजी पहाटे ०३.२० वा.चे दरम्यान फिर्यादी अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांचे घराचे कुलूप लोखंडी गजने पुढील दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करुन वरच्या मजल्यावरील देव घरातील ९६०००/- रु किं. चांदीच्या देवाच्या मुर्त्या, पितळी गाय-बैल असे फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरुन नेल्या होत्या बाबत त्यांनी दि. २२/११/२०२३ रोजी पश्चिम देवपूर पो.स्टे.ला भाग ५ गुरनं.३

७५/२०२३ भादंवि कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा गंभीर असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पो. निरी. श्री. दत्तात्रय शिंदे, स्थागुशा, धुळे यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थागुशा कडुन सुरु असतांना आरोपीतांचा शोध घेत असता,

पो.निरी.श्री. दत्तात्रय शिंदे, स्था.गु.शा. धुळे यांना गुप्त बातमीव्दारे माहिती मिळाली की, इसम नामे १) साहील शरीफ बेग, रा. मोगलाई धुळे २) रुपम दिनेश सोनवणे, रा. नकाणे रोड देवपूर धुळे हे स्नेह नगर धुळे येथे उभे आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने पो.निरी.श्री. दत्तात्रय शिंदे, स्था.गु.शा. धुळे यांनी लागलीच स्थागुशा धुळे येथील पथकास सदर ठिकाणी रवाना केले.

स्थागुशाचे पथक स्नेह नगर धुळे येथे गेले असता, दोन इसम हे खांडेल विप्र भवन स्नेह नगर धुळे येथे उभे असल्याचे दिसल्याने पथकाने सापळा लावुन दोन्ही इसमास पाठलाग करुन पकडले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) साहील शरीफ बेग, वय १९, रा. पंचशिल स्तभांजवळ, मोगलाई धुळे २) रुपम दिनेश सोनवणे, वय- २२,रा. नकाणे रोड आंबेडकर नगर देवपूर धुळे असे सांगितले त्यांना विश्वासात घेवुन वरील नमुद गुन्हया संदर्भात विचारपुस केली असता, त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली देवुन घर न.१५ अनमोल नगर सिध्दीविनायक कॉलनी देवपुर धुळे येथे घरफोडी चोरी केल्याचे सांगुन आमचे सोबत चला आम्ही घरफोडीतील चोरी केलेला मुद्देमाल काढुन देतो असे सांगुन रुपम दिनेश सोनवणे याच्या राहते घरातून खालील प्रमाणे मुद्येमाल काढून दिला तो,येणे प्रमाणे वरील नमुद आरोपीतांकडुन एकुण ७१०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

असुन त्यांना मुद्येमालासह गुन्हयाचे पुढील तपासकामी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री. श्रीकांत धिवरे साो, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. किशोर काळे सो, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थागुशा धुळे, पोसई. बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई. अमरजीत मोरे, असई. श्याम निकम, पोहेकॉ. प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, संदीप जगन्नाथ पाटील, योगेश चव्हाण, सुरेश भालेराव, पोना.प्रल्हाद वाघ, मायुस सोनवणे, तुषार सुर्यवंशी, पोकॉ. योगेश साळवे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा धुळे अशांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!