सलमान खानला जीव मारण्याची धमकी. —————————————- -सलमान खानच्या सुरक्षेचा पोलिसांकडून आढावा

24 प्राईम न्यूज 29 Nov 2023 सोशल मीडिया अकाऊंटवर गँगस्टर

लॉरेन्स बिष्णोईच्या नावावरून अभिनेता सलमान खानला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. पोलिसांनी अभिनेता सलमानला या धमकीबाबत अवगत केले आहे. मुंबई पोलिसांनी सलमान ‘वाय प्लस’ ही सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे.
सूत्रांनी सांगितले की, गँगस्टर बिष्णोई टोळीने कॅनडात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ग्रेवालच्या घराबाहेरून त्याच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या. गिप्पीने त्याच्या मित्राला सांगितले की, सलमान खानला आता कोणीही वाचवू शकत नाही.
गिप्पी ग्रेवालचा बंगला कॅनडाच्या व्हॅकव्हूर भागात आहे. तेथे रविवारी गोळीबार झाला होता. त्यानंतर बिष्णोई टोळीने फेसबुकवर लिहिले की, तू सलमान खानला मोठा भाऊ मानतोसतुझ्या भावाचा जीव वाचवून दाखव. तुला दाऊद वाचवेल, असे तुला वाटते. पण आमच्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही, असे धमकीत म्हटले. गिप्पीने वृत्तवाहिन्यांना सांगितले की, मी सलमान खानचा मित्र नाही. मी सलमानला केवळ दोन वेळा भेटलो. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलमानला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. त्यात एक पोलीस अधिकारी व चार कॉन्स्टेबल आहेत. तसेच दोन कॉन्स्टेबल हे सलमानच्या घराबाहेर असतात, तर चार जण सशस्त्र असतात. दरम्यान, सलमानने या प्रकरणी अजूनपर्यंत तक्रार केलेली नाही. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.