सरकारमध्ये गोंधळात गोंधळ
मुख्यमंत्री भुजबळांच्या पाठीशी, विखेंनी मागितला राजीनामा..

0

24 प्राईम न्यूज 30 Nov 2023 ओबीसी आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करीत असतानाच बुधवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विखेंच्या या मागणीमुळे महायुती सरकारमध्ये गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची भूमिका घेऊन राज्यभर सभांचा धडाका सुरू केला आहे. यात मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे मराठा-ओबीसी वाद चिघळण्याची भीती व्यक्त होत असतानाच बरेच दिवस मौन बाळगून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांवरहल्लाबोल करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा आग्रह धरला. ते निष्कारण राईचा पर्वत करून वाद वाढवत आहेत, असा आरोप केला. त्यामुळे मंत्र्यांमध्येच वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ मांडत आहेत. या भूमिकेचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी भुजबळ जी भूमिका मांडत आहेत. तीच सरकारची भूमिका आहे, असे म्हटले. त्यामुळे एका अर्थाने मुख्यमंत्रीही भुजबळांना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!