अनेक वर्षां पासून मतदासंघांचा ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी… १५३७.९५ लाखांचा निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर

0

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी १५३७.९५ लाखांचा भरघोस निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.
अमळनेर मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील होते.अनेक वर्षापासून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रस्त्यांचा बिकट प्रश्न भेडसावत होता.आमदार अनिल पाटील हे मागच्या दीड ते दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निधीसाठी पाठपुरावा करत होते.अखेर १५३७.९५ लाखांचा निधी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत मंजूर झाल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केले.
या निधीतून अमळनेर तालुक्यातील मारवड जैतपिर-६ किमी रस्त्यासाठी ४०७.९१ लाख, मुडी- बोदर्डे- भरवस- लोणपंचम- सबगव्हाण- चौबारी ९ किमी रस्त्यासाठी ७२४.३९ लाख,तर पारोळा तालुक्यातील शेवगे-पुनगाव-शेवगे बु.-कंकराज-रत्नपिंप्री ६किमी रस्त्यासाठी ४०५.६५, असा एकूण १५३७.९५ लाखांचा निधी मतदारसंघासाठी मंजूर झाला.लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
या भागातील ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या कामाबद्दल आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!