पतंग उडवताना नायलॉनचे मांजेचा वापर टाळावा..

अमळनेर (प्रतिनिधी) संक्रांतीच्या सण उद्या सर्व नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. लहान मुलांमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धाच लागली असते. पण ही स्पर्धा एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकते. अनेक वेळा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना ईजा पोहोचू शकते. इतकेच नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देखील दुखापत होऊ शकते. मांज्यामुळे एखादा मोठा अपघात होणे किंबहुना जीव जाणे ही शक्यताही नाकारता येत नाही.
संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना पतंग, मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेला पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. वाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे टाळावे, धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले.
संक्रांतीच्या दिवसांमध्ये पतंग उडवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहेत. याबरोबरच नायलॉन मांजाचा देखील वापर टाळला पाहिजे.