वेस्टइंडीज मधील भारतीय राजदूतांच्या हस्ते श्री मंगळग्रह मंदिरात सोमवारी महापूजा

अमळनेर(प्रतिनिधी)
येथील श्री मंगळग्रह मंदिरात गयाना (वेस्टइंडीज) येथील भारतीय राजदूत (हाय कमिशनर ऑफ इंडिया) डॉ.के.जे. श्रीनिवासा हे दि .१६ रोजी पहाटे पाच वाजेच्या नित्यप्रभात श्री मंगळाभिषेकासाठी १५ रोजी मंदिरात मुक्कामी येत आहेत. डॉ.श्रीनिवासा यांच्या निमित्ताने येथे प्रथमच राजदूत येत आहेत. त्या प्रित्यर्थ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिरात १६ रोजी सकाळी ८ वाजता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. काही उपक्रमांचाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे.