पवारांचा राजीनामा हे नाटकच !
-अजित पवारांचा गौप्यस्फोट भाजपसोबत जायला त्यानीच सांगितले..

24 प्राईम न्यूज Dec 2023 शरद पवार मला एक सांगत होते आणि वेगळेच करत होते त्यांनी मला भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हा, मी

राजीनामा देतो, असे सांगितले. १ मे रोजीच राजीनामाद्यायचे ठरले होते नंतर त्यांनी राजीनामाही दिला ते राजीनामा देत असल्याची माहिती फक्त घरातील तिघांनाच होती. त्यामुळे तिथे वेगळेच वातावरण तयार झाले राजीनामा मागे घेण्यासाठी तेथे आग्रह धरला गेला परंतु, प्रत्यक्षात वेगळेच चित्र होते. राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीच वाय. बी. सेंटरवर आंदोलन करायला सांगितले आणि
आंदोलनानंतर त्यांनी लगेच राजीनामा मागे घेतला.
त्यांची सतत धरसोडवृत्ती सुरू होती. तुम्हाला राजीनामा
मागे घ्यायचा होता, तर मग नाटक कशाला केले, असा
सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शरद पवारांबद्दल बरेच गौप्यस्फोट केले.याला खा. सुप्रिया सुळे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबिरात शुक्रवारी अजित पवार यांनी शरद पवारांवर वेगवेगळे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.