दगाफटका कराल तर सुट्टी नाही ! -जरांगे पाटील.

24 प्राईम न्यूज 2 Dec 2023 आम्ही आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच. आम्ही दंड

आणि मांड्या थोपटल्या आहेत. कोणा एकाच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी देणार नाही. गाठ मराठ्यांशी आहे, असे थेट आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी राज्य सरकारला दिले. गेल्या ७० वर्षांपासून आम्ही कष्ट करतोय आणि अन्याय सहन करतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणामांना सामोरं जा, असा इशाराही त्यांनी
दिला. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांची शुक्रवारी जालन्यात विराट सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देताना ओबीसी नेते छगन भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया- बहिणींवर हल्ला झाला, त्यांचे रक्त सांडले. इतके निष्ठूर सरकार आम्ही पाहिले नाही. एकीकडेदुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यांनंतर आमच्या लोकांना अटक केली लातूरमध्ये असं काय झालं की त्या ठिकाणी संचारबंदी केली. लातूरला आम्ही सभाघेणारच. आमच्यावर अन्याय केला एका व्यक्तीच्या दबावामुळे जर हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशारा छगन भुजबळ यांना दिला.