अजितदादांचे भाषण भाजपचीच स्क्रिप्ट !
संजय राऊतांची मन की बात..

24 प्राईम न्यूज 3 Dec 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित

पवार बोलताहेत ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खोटे ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. चारित्र्यहनन करीत आहेत, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, भाजपने पक्ष आणि घरं फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जात आहे. मंत्री दादा भुसे यांच्या मानहानी खटला प्रकरणात राऊत यांना न्यायालयाने किंचित दिलासा दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसे जावे. सध्या अजितदादा बोलत नाहीत तर भाजप बोलत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहत आहे, पण तसे होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचे सरकार येईल, असा विश्वास संज्य राउतानी व्यक्त केला.