तो मी नव्हेच…! अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवारांचे कानावर हात.

24 प्राईम न्यूज 3 Dec 2023 साहेबांनीव सत्तेत जाण्यास सांगितले, असा गौप्यस्फोट करणाऱ्या अजित पवार आणि त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. पवारांनी अजितदादा आणि सहकान्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बन्याच गोष्टी आपण पहिल्यांदाच म्हणत तो मी नवहेच..

– – अजितदादांना शरद पवारांचे प्रत्युत्तर
● अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, काही वाव होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.
आमच्या पक्षातील काही जणांकडून ज्यासंबंधीच्या मागण्या झाल्या (भाजपसोबत जाण्याबाबत) त्यासंदर्भात चर्चा झाल्या नाहीत, असे मी म्हणत नाही. चर्चा झाली होती. ते ज्या राजकीय पक्षासोबत जाण्याचा विचार करीत होते तो विचार आम्हाला मान्य नव्हता.
● आमचे विचार भाजपच्या विचारांशी सुसंगत नाहीत. भाजपसोबत जाणे योग्य नाही. ज्या लोकांनी आपले विचार मान्य केले आहेत त्यांची ती फसवणूक आहे.
● मी पक्षाचा अध्यक्ष होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयानंतर काही वेगळे करण्याचे कारण नव्हते. आमची स्वच्छ भूमिका होती की भाजपसोबत जायला नको.