आता ते ईव्हीएमवर खापर फोडतील – अजित पवार –

24 प्राईम न्युज 4 Dec 2023
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांमधील विधानसभा

निवडणुकांमधील निकालाबद्दल ईव्हीएमवर खापर काही लोकांनी फोडले तर मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर शरसंधान केले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान या हिंदी बहुभाषिक राज्यांमध्ये भाजप सत्तेच्या दिशेने जात आहे या पार्श्वभूमीवर रविवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे लोकांकडून कौतुक होत आहे.
इंडिया अलायन्समधील लोकांनी जर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) या राज्यातील भाजपच्या विजयी घोडदौडीचे खापर फोडले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी सांगितले. जर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर मग तेलंगणाचे काय, असाही सवाल अजित पवार यांनी केला.