100 कोटी रु पेक्षा जास्त घोटाळा, चौकशी करून गुन्हा दाखलची केली मागणी. ——————————————– शेतक्यांना कर्ज बजारी करून मृत्यू च्या दाराशी कसे आणून ठेवले….

अमळनेर/प्रतिनिधि.

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात अशोक आधार पाटील सभापती कृ उ बाजार समिती अमळनेर त्यांचा शालकं समाधान दिगंबर शेलार शेडनेट उभारणी करणाऱ्या कँपन्या चे मालक,कृषी खाते चे काही

कर्मचारी,बँक कर्मचारी व इतर सहभागी असलेले लोक यांच्या बद्दल आज पोलिस अधीक्षक एन राज कुमार साहेबांची भेट घेतली असता शेडनेट घोटाळा अमळनेर सह जळगांव धुळे,नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, जालना ,बीड व इतर जिल्ह्यात याची व्याप्ती कशी आहे तसेच हा घोटाळा 100 कोटी रु पेक्षा कसा जास्त आहे याची माहिती सांगितले हे सर्व करून दलाल व यासंबंधित ठेकेदारांनी शेतक्यांना कर्ज बजारी करून मृत्यू च्या दाराशी कसे आणून ठेवले शेतकऱ्यांची फसवूनक कशी झाली,आर्थिक फसवणूक कशी झाली,या बाबत सविस्तरपणे माहिती व तक्रार देऊन चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली , तसेच पोलीस अधीक्षक साहेबांनी चौकशी पारदर्शक करू व दोषी वर कारवाई करू असे आश्वासन दिले. सोबत अनंत निकम उपशहर प्रमुख,उबाठा सचिन वाघ राष्ट्रवादी कारकर्ता कैलास पाटील,दिनेश पाटील, नारायण पाटील,ईश्वर पाटील,उमाकांत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते