मुलींची पहिली शाळा ओळखले जाणारे भिडे वाडा जमीनदोस्त. ————————– — -सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी स्थापलेल्या पहिल्या शाळेच्या स्थानी आता होणार राष्ट्रीय स्मारक..

24 प्राईम न्यूज 6 Dec 2023 समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती, तो ठिकाण म्हणजे पुण्यातील
ऐतिहासिक असा भिडे वाडा. न्यायालयाच्या आदेशानंतर एक महिन्याने, पुणे महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे भिडे वाड्याची जीर्ण इमारत उद्ध्वस्त केली.

या ठिकाणी समाजसुधारक अशा या दाम्पत्याला समर्पित राष्ट्रीय स्मारक बांधण्याची योजना पुणे महापालिका आखत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतली होती. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात भिडे वाडा आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पुणे महानगरपालिकेला या जागेवर राष्ट्रीय स्मारक बांधण्याचा मार्ग मोकळा केला आणि जीर्ण इमारतीतील दुकान मालक आणिभाडेकरूंना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले.
वाड्याची ही एकूण व्याप्ती २७०० चौरस फुटांपेक्षा जास्त असून मंगळवारी ती पाडण्यात आली. या ठिकाणी राहाणाऱ्या भाडेकरू व दुकानदार यांना जागा रिक्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती, ती २ डिसेंबर रोजी संपली होती, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
या अनुषंगाने ४ डिसेंबरला येथील