बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन दाखवा.—- -शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान


24 प्राईम न्यूज 6 Dec 2023
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. सगळे वातावरण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग हे कसे घडले, हा प्रश्न मतदारांना पडत असेल.एवढी तुमची लाट असेल, तुमच्यात हिंमत असेल, तर शंका दूर करण्यासाठी लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हानही शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.