श्रीमती. द्रौ.रा कन्याशाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा..

अमळनेर/प्रतिनिधि

दिनांक ६ डिसेंबर श्रीमती दौ.रा.कन्या शाळेत महापरिनिर्वाण दिन सकाळ व दुपारी विभागाच्या दोन्ही सत्रात साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. शाळेचे शिक्षक डी.एम. निघोट यांनी आपल्या मनोगत आत संविधाना विषयी माहिती दिली. पर्यवेक्षक व्ही.एम.पाटील, ज्येष्ठ शिक्षका एस.पी. बाविस्कर,एस.एस.माळी,जे. व्ही.बाविस्कर, डी.एन.पालवे,आर.एस. सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी सकाळ व दुपारी विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.