स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल[ सी. बी .एस .ई.]येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन….

अमळनेर/प्रतिनिधि
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना

निमित्त स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी बी एस ई] येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर यांनी प्रतिमेचे पूजन केले. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आले तेव्हा त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर यांनी डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच अधिकारापेक्षा कर्तव्य पूर्ती करने महत्त्वाचे असते असा मोलाचा संदेश दिला. राष्ट्रगणाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.