नवाब मलिकांवरुन महायुतीत महाअडचण.— -नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका -फडणवीसांचा अजितदादांना पत्रातून सल्ला..

24 प्राईम न्यूज 8 Dec 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गुरुवारी सत्ताधारी बाकावर बसताच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आता तुम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर मलिक तुरुंगात गेल्यावरही तुम्ही त्यांचा राजीनामा का पेतला नाही, याचे उत्तर आधी द्या, असे म्हणत फडणवीसांनी सारवासारव केली खरी, परंतु विरोधकांचा जोर वाढल्यावर मलिकांना महायुतीत न पेण्याचा जाहीर सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिला. फडणवीसांच्या या सल्यामुळे अजितदादा गटाची कोंडी झाली आहे मलिकांच्या सत्तेतील सहभागावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. आता तुम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर मलिक तुरुंगात गेल्यावरही तुम्ही त्यांचा राजीनामा का घेतला नाही, याचे उत्तर आधी द्या, असे म्हणत फडणवीसांनी सारवासारव केली खरी, परंतु विरोधकांचा जोर वाढल्यावर मलिकांना पक्षात घेऊ नका, असा जाहीर सल्ला देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना पत्राद्वारे द्यावा लागला. फडणवीसांच्या या सल्ल्यामुळे अजितदादा गटाची कोंडी झाली आहे. आता अजितदादा गट यावर काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.