सार्वजनिक ठिकाणी महिलेचा विनयभंग, महिला व नवऱ्याने दिला चोप,
शहर पोलिस ठाण्यात 354 अन्वय गुन्हा दाखल.

नंदुरबार /प्रतिनिधि
शुक्रवारी 11:30 ते 12:00 चे दरम्यान साक्री नाका ते एल. टी. ग्राउंड दरम्यान एकटी महिला बघुन त्याच्याशी अशलील बोलणी व वर्तणूक करत

असल्यामुळे गफ्फार अब्दुल रहमान पिंजारी उर्फ गफ्फार मस्तान राहणार पटेलवाडी नंदुरबार याला सदर महिलेने आरडा ओरड करत चप्पलने आरती करायला सुरवात केली आरडा ओरड ऐकुन तिचे पती व पत्नीने भरपूर चोप दिला, शहर पोलिस ठाण्यात सदर महिलेचा तक्रारीवर गु. र. नं. 921/2023 अन्वय भा. दं. वी. कलम 354, 354अ व 323 प्रमाणे गफ्फार मस्तानवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याची चाहूल लागताच आपले कुकृत्य लपवन्यासाठी मेडिकल मेमो घेऊन जिल्हा रुग्णालय येथे ऍडमिट झाला व आपले राजकीय आकांचे आश्रय घेत एम आई एम चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफत हुसैन व इतर 3 विरुद्ध खोटी फिर्याद दिली की मला मारहाण करून माझी सोन्याची चेन व 15000 रुपये काडुन घेतले, त्याच्या फिर्यादवर पोलिसांनी तत्परता दाखवत गु. र. नं. 920/2023 अन्वय भा. दं. वी. कलम 394 प्रमाणे गुन्हा नोंद करून रफअत हुसैन यांना त्यांचे जनसंपर्क कार्यालयात अटक करण्यास गेले असता कमालीचे वातावरण निर्माण झाले रफत हुसैन यांनी सर्वांना शांत करत आलेल्या पोलिसांना कार्यालयातील असलेलं CCTV ची घटनेच्या वेळची रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून दिली व त्यांचे सोबत पोलिस स्टेशन गेले रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सदर फुटेज ची खात्री करून आपल्या वरीष्ठाशी सल्लामसलत करून रफत हुसैन यांना सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रफत हुसैन यांच्यावर दाखल होत असलेले खोटे गुन्हहंची दखल घेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सैय्यद मोईन ह्यांनी थेट आई.जी. नाशिक यांना संपर्क साधुन घटनेची माहिती घेत निष्पक्ष कार्यवाही होण्यास बोलले असल्याचे समजते.
सदर घटनाक्रम मुळे काल दिवसभर वातावरण कामालीचे झाले होते.
संबंधित महिलेने पोलिस अधीक्षक साहेबांना न्याय साठी गुहार लावली आहे. संपूर्ण शहरात वरील घटनेचा निषेध होत आहे व दिवसा ढवल्या एकटी महिला बघुन तिची छेड काडुन विनयभंग केलेल्या नराधम वर कडक कारवाई ची मांग होत आहे.
पुढील कारवाई काय यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.