आजपासून नाशकात
कांदा लिलीव बेमुदत बंद..

24 प्राईम न्यूज 9 Dec 2023

केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचेदर नियंत्रणात आणण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदीचा निर्णय वाढवला आहे. लासलगाव, मनमाड,केंद्राचे परिपत्रक जारी होताच लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला. दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहेत, मात्र आता निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे
नांदगाव आदी बाजारपेठेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४ हजार रूपयांपर्यंत पोहचले होते. ते आता कमी होऊन प्रति क्विंटल ४ हजार रुपयांवर आले आहे. सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यात आज शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. व परिणामी राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटणार आहे.