राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? अंतिम फैसला होणार..

24 प्राईम न्यूज 9 Dec 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. दोन्ही गटांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दोन्ही गटांच्या वतीने पुढील आठवडाभरात लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर आयोग आपला निर्णय जाहीर करेल. त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला होणार आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांना सांगितले की, संघटनेचे मत विचारात घेऊ नका, असे अजित पवार गटाकडून सांगण सांगण्यात आले आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे संघटना नाही. आमची मते लेखी स्वरूपात देण्यासाठी आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे, तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. विधिमंडळातील आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ५ दिवसांचा वेळ दिला आहे, पण आयोगात झालेले विवेचन पाहता निर्णय आमच्या बाजने लागेल. असे मत तटकरेंनी व्यक्त केले.