जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक-अजितदादा

24 प्राईम न्यूज 13 Dec 2023

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकार स्तरावरसुद्धा वेगळा विचार सुरू आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यासंदर्भात केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर राज्य सरकारही त्याच पद्धतीने वाढ करीत असते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्यातही निर्णय घेण्यात येईल.