युवा संघर्ष यात्रेवर लाठीमार
आ. रोहित पवार आक्रमक. कार्यकर्ते ताब्यात..

0

24 प्राईम न्यूज 13 Dec 2023

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील युवा संघर्ष यात्रेचा समारोप मंगळवारी नागपुरात झाला. त्यानंतर आपल्या मागण्यांसाठी ही यात्रा थेट विधानभवनावर धडकणार होती. मात्र, यात्रेला पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आ. पवार यांच्यासह युवा पदाधिकारी, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. थेट बॅरिकेट्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत थेट युवा संघर्ष यात्रेवर लाठीमार करीत युवा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि कार्यकत्यांत झटापटही झाली. यावेळी आमदार रोहित पवार आक्रमक झालेराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला, त्यानंतर नागपूरच्या विधानभवनासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या पाश्र्वभूमीवर सरकारकडे मागण्या केल्या. मात्र, या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचा एकही जबाबदार प्रतिनिधी हजर झाला नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्ते आक्रमक झाले. जर आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास जबाबदार व्यक्ती येत नसेल, तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असा पवित्रा आमदार रोहित पवार यानी घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!