अजित पवारांविरुद्ध तीव्र संताप
विद्यार्थी आक्रमक, पीएच ही धारकांबद्दलचे वक्तव्य अंगलट..

24 प्राईम न्यूज 13 Dec 2023

सारथी संस्थेच्या माध्यमातून पीएच. डी करून पोरं काय दिवे लावणार… या विधानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेचा माज चढल्याचे स्पष्ट होते. शिक्षण हा आमचा अधिकार आहे. अजित पवारांचे हे विधान शिक्षण व्यवस्थेच्या विरोधातील आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (13 डिसेंबर) विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
सारथी संस्थेच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असून, त्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली होती. त्यावर पीएच.डी करून पोरं काय दिवे लावणार, असे धक्कादायक विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानाचा नाना पटोले यांनी आज समाचार घेतला. शाहू, फुले, आंबेडकरांनी शिक्षणाचा पाया घातला आणि तो देशभर विस्तारला. यातून महिला सुद्धा शिक्षण मोठ्या पदावर पोहोचल्या, असे ते म्हणाले