संसदेची सुरक्षा भेदली
लातुरच्या तरुणासह पाच जणांना अटक : रंगीत गॅस फवारत दहशत माजवण्याचा प्रयत्नल..

24 प्राईम न्यूज 14 Dec 2023

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे इशल्याच्या कटू आठवणीदिवशीच बुधवारी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेली, बुधवारी दुपारी संसद भवनाच्या प्रेक्षक गॅलरीतून खाली उदया भारत बुटांमध्ये लपवून आणलेला पिवळा गैस फवारत दहशत माजवण्याचा दोघांनी प्रदान केला, तर दुसरीकडे ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशी घोषणाबाजी करत लातूरच्या अमोल शिंदे आणि हरयाणातील हिसारची रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय नीलम सिंग यांनी केंडल स्मोक जाळून संसदेबाहेर खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला, या चौघांसह त्यांना मदत करणाऱ्या विकी शर्मा वाला पोलिसांनी अटक केली आहे वेगवेगळ्या राज्यांतूनआलेल्या या तरुणांना गुरगावमध्ये आश्रय देणारा ललित जा हा मात्र अद्याप सापडलेला नाही, दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू असे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर केद्रीय गृह मंत्रालयाने मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.