अमळनेरात रोटरी उत्सवाचा आज उद्घाटन समारंभ. . . -आर के पटेल फॅक्टरीच्या भव्य कंपाऊंड मध्ये चार दिवस रंगणार उत्सव.


अमळनेर/ प्रतिनिधि
अमळनेर येथील रोटरी क्लबच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रोटरी उत्सव 2023 चे आयोजन दि 14 ते 17 करण्यात आले असून उद्घाटन समारंभ आज दि 14 रोजी सायंकाळी 4 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आर के नगर समोरील आर के पटेल फॅक्टरीच्या भव्य कंपाऊंड मध्ये चार दिवस हा उत्सव रंगणार असून यात ऑटो झोन,बिझिनेस झोन,फूड झोन आणि प्ले झोन ची मेजवानी साऱ्यांना मिळणार आहे.आज उद्घाटन समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उदघाटक म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल सौ आशा वेणूगोपाल तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ,माजी आमदार शिरीष चौधरी,विशेष अतिथी म्हणून प्रांताधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर,तहसीलदार रुपेश सुराणा,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,रोटरी चे सहाय्यक प्रांतपाल रविंद्र शिरोडे,माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे आदींची उपस्थिती लाभणार आहे.यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट कडून प्रोजेक्ट उडान अंतर्गत 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी उद्योजक प्रविण साहेबराव पाटील,उद्योजक विनोदभैय्या पाटील,नर्मदा मेडिकल फाऊंडेशनचे डॉ अनिल शिंदे,मुंदडा फाऊंडेशनचे ओमप्रकाश मुंदडा,आशापुरी कन्स्ट्रक्शन चे अनिल वाणी,स्वादिष्ट ग्रुपचे विजय पाटील,पप्पूज आईस्क्रीमचे भुपेंद्र जैन,श्री बालाजी ज्वेलर्स चे कुशल विसपुते, रोटरीचे नाना शेवाळे,संतोष कदम,आर्किटेक्ट पराग पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
उत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश जनतेसाठी
सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम राबविण्यासाठी हा रोटरी उत्सव होत असून याचा मुख्य उद्देश ग्रीन अमळनेर, क्लीन अमळनेर या प्रोजेक्टसाठी निधी उभारणे,एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांचे जीवनमान उंचविण्यासाठी मदतनिधी उभारणे,मोबाईल मेडिकल चेकअप व्हॅन या प्रोजेक्टसाठी निधी उभारणे, रोटरी तर्फे चालविण्यात येणाऱ्या आदिवासी शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी उभारणे व रुग्णांसाठी डायलेसिस सेंटर व आर्थोपेडीक लॅब या प्रोजेक्टसाठी निधी उभारणे हा असल्याची माहिती रोटरी अध्यक्ष प्रतीक जैन यांनी दिली.
उत्सवाची वैशिष्ट्ये,,, आज पासून 17 पर्यंत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत हा उत्सव खुला होणार असून या उत्सवाची वैशिष्ट्ये म्हणजे यात चार झोन असणार आहेत, ऑटोझोन मध्ये देशातील ऑटोमोबाईल कंपन्याचे स्टॉल,इलेक्ट्रिक बाईक व कार,बिझिनेस झोन मध्ये इमिटेशन ज्वेलरी, रेडिमेड कपडे,सोलर उत्पादने, गृह सजावट सामान,कॉम्पुटर्स, गृह सजावटीचे सामान, विविध बांधकाम व्यवसायिकांचे स्टॉल्स इ.,फूड झोन मध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व प्ले झोन मध्ये लहान मुलांसाठी आकर्षक प्ले झोन,आकर्षक झुले,राईड्स,रिंग बारा छत्तीस,मनोरंजन झुला,टोरा-टोरा,शिप,क्रॉस पाळणा इ विविध खेळणी असणार आहेत.
सांस्कृतिक व्यासपीठ करणार मनोरंजन,,, उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी सांस्कृतिक व्यासपीठ असणार असून यात शहरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विविध कलागुणांच्या प्रोत्साहनासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम,व्याख्याने,मनोरंजनात्मक कार्यक्रम,म्युझिकल नाईट,पथनाट्य,विविध स्पर्धा,तसेच लकी ड्रॉ कुपन द्वारा बक्षिसांचे वाटपही होणार आहे. तरी तालुक्यातील तमाम जनतेने सहकुटुंब या उत्सवात उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन विनोदभैय्या पाटील,रोहित सिंघवी,पूनम कोचर,प्रेसिडेंट प्रतीक जैन,सेक्रेटरी देवेंद्र कोठारी,रोटरीअन्स क्लब प्रेसिडेंट पूर्वा वशिष्ठ, सेक्रेटरी शिल्पा सिंघवी व प्रोजेक्ट चेअरमन रुपल गोसलिया यांनी केले आहे.