सूत्रधार दुसराच ?संसदेत गदारोळ माजवन्याचा असा रचला कट.

24 प्राईम न्यूज 15 Dec 2023

संसदेत घुसखोरी करणारे सहाही तरुण सोशल मीडिया पेज भगत सिंग फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षांपूर्वी या सगळ्याची भेट म्हैसूर येथे झाली होती. नऊ महिन्यानंतर त्यांची भेट परत झाली. त्यावेळी त्यांनी संसदेत गदारोळ माजवण्याचा कट रचला. यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मनोरंजन डी हा बंगळुरूतून आला होता.त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली होती. जुलै महिन्यात सागर लखनऊहून दिल्लीला आला. मात्र, त्याला संसद भवनात जाता आले नव्हते. त्याने संसदेची बाहेरून रेकी केली होती.
रेकीच्या वेळी मनोरंजन डी ने संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नसल्याची नोंद केली. १० डिसेंबरला हे सगळेजण एक- एक करून आपल्या राज्यांमधून दिल्लीला आले. मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला. सगळे आरोपी १० डिसेंबरच्या रात्री गुरुग्राम या ठिकाणी विकी आणि वृंदा यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी उशिरा ललितझा हा तरुणही तिथे पोहचला होता. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातून धूर असलेले फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने १३ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला. सगळे आरोपी इंडिया गेट या ठिकाणी भेटले होते. त्याच ठिकाणी अमोलने सगळ्यांना धुराचे फटाके दिले.
सागर शर्मा आणि मनोरंजन १३ डिसेंबरच्या दुपारी १२ च्या आसपास संसदेच्या आत गेले. अमोल आणि नीलम हे दोघे संसदेच्या बाहेर थांबले आणि त्यांनी घोषणा सुरू केल्या. ललित झा हा त्यांचा व्हिडीओ बनवत होता. सिग्नल नावाच्या अपने हे सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. हंगामा झाल्यानंतर ललित सगळ्यांचे मोबाइल घेऊन फरार झाला. या प्रकरणात विकी शर्मा आणि त्याची पत्नी वृंदा यांनाही गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. ललित झा हा तरुण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.