जुनी पेन्शन योजनेवरून पुकारलेला बेमुदत संप मागे..

24 प्राईम न्यूज 15 Dec 2023

घेण्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी केली आहे. पुढील अधिवेशनापर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे शासनाच्या विविध विभागांत होणारा संभाव्य परिणाम टळला आहे. जुनी पेन्शनबाबतच अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिला आहे. रद्द करण्यात आलेली जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च २०२३ मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक, परिचारिका यांनी या संपात सहभाग नोंदवला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुन्या पेन्शनच्या संदर्भाने गुरुवारी निवेदन केले. त्यात त्यांनी पेन्शनबाबत आश्वस्त केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याची घोषणा केली.