विज्ञान प्रदर्शन-ना. अनिल पाटील यांनी केले उदघाटन… . -प्रदर्शनास सहभागी विद्यार्थी एक दिवस नक्कीच अमळनेरचे नाव उज्वल करतील. -मंत्री अनिल पाटील

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पंचायत समिती शिक्षण व तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंदडा ग्लोबल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

मंत्री आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की अज्ञानातून आपल्याला विज्ञानाकडे जायचे असल्याने मुलांसाठी असे विद्यार्थी प्रदर्शन भरवले जात असते शासन कार्यक्रम देते म्हणून आपण केवळ कार्यक्रम म्हणून त्याकडे न पाहता मुलांनी प्रॅक्टिकल बनावे शिक्षकांनी देखील तेच धोरण ठेवावे प्रदर्शनास सहभागी विद्यार्थी एक दिवस नक्कीच अमळनेरचे नाव उज्वल करतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश मुंदडा, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, ग्लोबल स्कूलचे प्राचार्य ल लक्ष्मण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, प्राध्यापक सुरेश पाटील, दीपिका मुंदडा ,लक्ष्मण विजय धनगर ,आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले यावेळी केंद्रप्रमुख शरद सोनवणे, संजय हरी पाटील ,विजय पवार, बबन पाटील ,यासह शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले प्राथमिक विभागाचे परीक्षकांचा सहभाग असून विद्यार्थी गटात प्राथमिक विभागाचे 88 तर माध्यमिक विभागाच्या 80 विद्यार्थ्यांचा तर एक प्रयोगशाळा सहाय्यकाचा सहभाग आहे विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करून प्रयोगाचे विविध मॉडेल सादर केले आहेत सदर संपूर्ण प्रदर्शनाची मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले परीक्षक म्हणून बी आर महाजन, विजय मोरे ,संजय पाटील ,यांनी काम पाहिले यांनी गणित मंडळाध्यक्ष डीए धनगर विज्ञान मंडळाध्यक्ष निरंजन पेंढारे ,कार्याध्यक्ष डी के पाटील, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, दिलीप सोनवणे ,अशोक सोनवणे, चंद्रकांत साळुंखे ,किरण शिरोदे ,राजेंद्र गवते ,भगवान पाटील, यासह शिक्षक वृंद बालक आणि विद्यार्थी उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मॉडेलची पाहणी ना पाटील यांनी केली ती जाणून घेतली शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आपत्ती व्यवस्थापन मॉडेलची कौतुक केलं या वेळी साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक राहुल पाटील, आणी रोहित पाटील उपस्थित होते