२४ डिसेंबरच्या अल्टिमेटमवर आज घेणार निर्णय-मनोज जरांगे..

0

24 प्राईम न्यूज 17 Dec 2023 मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमवर आज रविवारी निर्णय घेणार असल्याचे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरागे-पाटील यांच्याशी रुणालयात जाऊन चर्चा केली. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयनशील आहे. राज्य सरकार १०० टक्के आरक्षण देण्यासाठी वेगात काम करीत आहे, असे गिरीश महाजन यांच्याकडून जररागंना सांगण्यात आले. त्यानंतर आमच्याशी दगाफटका झाला, आमच्या माणसांना विनाकारण अटक करण्यात आली, असे म्हणत सरकार माध्यमांसमोर एक बोलते तर प्रत्यक्षात वेगळेच करते, असे म्हणत २४ तारखेच्या अल्टिमेटमवर आज निर्णय घेणार असल्याचे जरार्गेनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!