शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

अमळनेर /प्रतिनिधि

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य कबड्डी स्पर्धा रंगल्या. मुंदडा ग्लोबल स्कुल शेजारील मैदानात या स्पर्धा झाल्या. सकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उन्मेष पाटील, प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर, कमलबाई पाटील, डॉ किरण पाटील, अरुण शिंदे, रफिक मिस्तरी, मुशिर शेख, सतीश देशमुख उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष घनश्याम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सचिन वाघ यांनी केले होते.