मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अमळनेरात मा पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

अमळनेर/ प्रतिनिधि

अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अमळनेरात भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
गलवाडे रोड येथील मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, सुरवातीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ सतीश पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील , माजी आमदार डॉ बी एस पाटील , जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील , ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उन्मेष पाटील , प्रदेश समन्वयक सौ रिता बाविस्कर , शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील कमलबाई पाटील , डॉ किरण पाटील , अरुण शिंदे , लतीब मिस्तरी , रफिक शेख , सतीश देशमुख उपस्थित होते. सदर स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील , शहराध्यक्ष श्याम पाटील केले होते नियोजनाची जबाबदारी अनिरुद्ध शिसोदे , सचिन वाघ , सनी गायकवाड , शुभम पवार , राहुल पाटील , कल्पेश पाटील , उज्वल मोरे , ललित पाटील , गौरव पाटील , हितेश पाटील , नितेश परब , साहील टकारी , रविकांत कोळी , विवेक बागळे यांनी पार पाडली
स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग
सदर कबड्डी स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन एकूण ३५ संघ सहभागी झाले होते यात शहरी व ग्रामिण भागातील शाळा तसेच चाळीसगाव , भडगाव , पारोळा , धुळे , शिंदखेडा येथील संघांचाही सहभाग होता. प्रत्येक संघाने अतिशय रोमांचक कामगिरी दाखविली. समालोचक म्हणून उपस्थित असलेले डी बी बहीरम यांनी उत्तम समालोचन करून रंगत वाढविली. कोच व परिक्षक म्हणून सुनील वाघ , अनिरुद्ध शिसोदे , मिलिंद पाटील , जे व्ही बाविस्कर व क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले. स्पर्धा पाहण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी याठिकाणी उसळली होती रात्री उशिरा अंतिम सामना शिवनेरी क्लब , मोहाडी धुळे यांनी जिंकला उपविजेता म्हणून फ्रेंड्स क्लब मारवड अमळनेर यांनी तर तृतीय पारितोषिक अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशन अमळनेर यांनी जिंकले