महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोघा महिलांना पोलीस स्टेशनला चल सांगणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या कानशिलात मारल्याने दोघांना जेलची हवा खावी लागली…

अमळनेर /प्रतिनिधि महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोघा महिलांना पोलीस स्टेशनला चल सांगणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या कानशिलात मारल्याने दोघांना जेलची हवा खावी लागली आहे.
१७ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकावर अमळनेर चोपडा बसमध्ये सारबेटे येथील प्रतिभा राजेंद्र कोळी या महिलेची सोन्याची पोत बळजबरीने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला. आणि तिलाच मारहाण सुरू केली. म्हणून बसस्थानक ड्युटीवरील अशोक कुमावत आणि महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांनी महिलांना खाली उतरवून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. त्यावेळी त्या महिलांनी सुनीता सागर चौधरी वय ३९ रा वाघाडी पंचवटी नाशिक , व ममता सतीश चौधरी वय २५ रा एमआयडीसी इच्छादेवी पोलीस चौकी मागे जळगाव या दोघांनी महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे याना कानशिलात मारली आणि शिवीगाळ करून मीडिया बोलवून तुझी नोकरी खाऊन जाईल म्हणून धमकी दिली. जरे यांनी ताबडतोब पोलीस गाडी बोलावून दोंघा महिलांना अटक केली. दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत. दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.