राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या दिनेश बागडेची फटाक्याची आतषबाजी करत काढली मिरवणूक..

अमळनेर/ प्रतिनिधि. दिव्यांग दिनेश बागडे याने मिळवलेल्या यशाबद्दल अमळनेरात क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सायंकाळी विजय मारोती मंदिरापासून महाराणा प्रताप चौक, न्यायालय, मंगलमूर्ती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यंत जिप वर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी,खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर पाटील, डॉ. दिनेश महाजन, राहुल कंजर, योगेंद्र बाविस्कर, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पत्रकार संजय पाटील, रामोशे सर,योगेश महाजन, डॉ नितेश माचरे, सागर विसपुते, टोनी बागडे, गोपी, पंकज कंजर, राकेश अभांगे, सुरज अभंगे यांच्यासह क्रीडा प्रेमी सहभागी झाले होते.