अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ?

24 प्राईम न्यूज 19 Dec 2023 मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. दाऊद अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत एका रुग्णालयात दोन दिवस उपचार घेत होता. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी यू ट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट करताच सोशल मीडियात खळबळ माजली. दाऊद पाकिस्तानातच असल्याचे जगासमोर येऊ नये अशी भीती पाकला वाटते. पाकिस्तानातील इंटरनेट, गुगल, ट्विटर, यू ट्यूब असे सर्व सोशल मीडिया ठप्प झाल्याने शंका बळावल्याचे काझमी यांनी म्हटले आहे. . मुंबई पोलिसांकडून चौकशी
दाऊदच्या तब्येतीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने दाऊदचे भाचे अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्या घरी धडक दिली. दुसरे लग्न केल्यानंत्र दाऊद कराचीमध्ये वास्तव्यास असल्याचे दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने एनआयएला जानेवारीमध्ये सांगितले होते. डी गंगच्या मते दाऊद त्याच्या कराचीच्या घरात ५ ते ६ स्तरीय सुरक्षा व्यवस्थेत राहतो. त्याला विषबाधा होण्याची किंवा त्याच्यापर्यंत कुणी पोहचण्याची शक्यता फारच कमी आहे.