सलीम कुत्ता की कुर्ला ?
हिवाळी अधिवेशनादरम्यान उडाला गोंधळ..

24 प्राईम न्यूज 19 Dec 2023 विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात सोमवारी सलीम कुत्ता की कुर्ला यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाशिक शिवसेना ठाकरे गटाचा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर याने पार्टी केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता, परंतु त्यानंतर सोमवारी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीसलीम कुत्ता याची १९९८मध्ये हत्या झाल्याचा दावा केला. यामुळे सुधाकर बडगुजरसोबत असणारा सलीम कुत्ता कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु सोमवारी रात्री उशिरा आता यावर स्पष्टीकरण आले. कैलास गोरंट्याल यांनी दावा केलेल्या आरोपीचे नाव सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला असल्याची माहिती समोर आली. सलीम कुत्ताची १९९८ साली विरोधी गंगकडून हत्या झाल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले, परंतु आमदार गोरंट्याल यांचा सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन नावात गोंधळ झाला.