राज्यात कोरोना जेएन-१ सब व्हेरियंट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट..

24 प्राईम न्यूज 22 Dec 2023 राज्यात कोरोना जेएन-१ सब व्हेरियंट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली.
राज्यभरातील रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे. यासाठी राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.