सगे-सोयरेवरून चर्चा निष्फळ !
मनोज जरांगे २४ डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम..

24 प्राईम न्यूज 22 Dec 2023. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी गुरुवारी राज्य सरकारतर्फे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे अंतरवाली सराटी येथे गेले. जवळपास पाऊण तास झालेल्या चर्चेत सोयरे नेमके कोणाला म्हणायचे यावर गाडे अडले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हा विषय बाजूला ठेवण्यात आला. कुणबी नोंदी आढळणाऱ्यांच्या आई, मामांकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी राज्य सरकारने आवश्यक शब्दांचा कायद्यात समावेश करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. शिवाय मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत शासनासमवेत चर्चा करण्यास तयार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले, मात्र मनोज जरांगे यांची ही मागणी गिरीश महाजन यांनी फेटाळून लावल्याने ही चर्चा निष्फळ ठरली.