हिवाळा आणि सायलेंट हार्ट अॅटॅक.

24 प्राईम न्यूज 22 Dec 2023 तज्ज्ञांच्या माहितीनुसार हार्ट अॅटॅक हृदयातील नसांमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे येतो, पण बऱ्याच वेळा त्याची लक्षणे सौम्य असल्याने समजून येत नाहीत. यामुळे या दुखण्याकडे सहज दुर्लक्ष होतं. पोटात गॅस झाल्याने छातीत दुखत असेल असे आपण समजतो, पण नंतर जर हे दुखणे बळावले, अस्वस्थ वाटू लागले तर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ हॉस्पिटल गाठावे. तेथे ईसीजी व इतर आवश्यक तपासण्यांमधून हार्ट अॅटॅक आला ते कळते. यालाच सायलेंट हार्ट अॅटॅक असे म्हणतात.
सायलेंट हार्ट अॅटॅक येण्याआधी अपचन, चक्कर येणे, झोप न लागणे, घाम येणे, मळमळ, श्वास घेण्यात अडचण, दीर्घकाळापर्यंत थकवा, पाठ किंवा छातीच्या स्नायूंचा ताण जाणवतो. मान, खांदा आणि जबड्यामध्ये वेदना होतात. खूप घाम येऊ लागतो. यावेळी छातीत तीव्र वेदना होतील असे नाही तर काही वेळा फक्त वरील त्रास होऊ शकतो. . सायलेंट हार्ट अॅटॅकचा धोका या व्यक्तींना असतो
हाय कोलेस्ट्रॉल – कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्यानेही सायलेंट हार्ट अॅटॅक येऊ शकतो लठ्ठपणा – अति वजनामुळे हृदयावर अनावश्यक ताण येतो आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढू शकतो हाय ब्लड प्रेशर – हाय ब्लड प्रेशरदेखील सायलेंट हार्ट अॅटॅकचे कारण ठरू शकते वय – खरंतर वयानुसार सायलेंट हार्ट अॅटॅकचा धोका वाढू लागतो.
धूम्रपान – हल्ली तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याचे फॅड सुरू झाले आहे, मात्र ही सवय हार्ट अॅटॅकला आमंत्रण दिल्यासारखीच आहे. सिगारेटच्या धुरात असलेले विषारी पदार्थ रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचवतात, ज्याने हार्ट अॅटॅक येऊ शकतो.
फॅमिली बॅकग्राऊंड – जर तुमच्या फॅमिलीमध्ये हार्ट अॅटॅकचा इतिहास असेल तर तुम्हालाही त्याचा धोका असतो. अशा वेळी वेळोवेळी चेकअप करणे गरजेचे असते.