शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा… अन्यथा तीव्र आंदोलन करणार….

अमळनेर/ प्रतिनिधि शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा आतंक खूपच वाढला आहे. तरी शहरातील नागरिकांना त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे गेल्या दहा दिवसापासून अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे तरी नगरपालिका यावर तोडगा काढत नाही नगरपालिका व प्रशासन झोपले आहे का? आपण यावर तोडगा नाही काढल्यास नगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर आंदोलन करेल तरी लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदिप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, शहर सचिव आदित्य पगारे, शहर उपाध्यक्ष आलोक सोनवणे व मनसे सैनिक उपस्थित होते.