साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये प्रश्नमंजुषा घेऊन गणित दिवस साजरा..

अमळनेर /प्रतिनिधि येथील साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये गणित दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे होत्या. त्यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थिनिंना गणिताचे प्रश्न विचारून ज्या विद्यार्थिनिंना प्रथम उत्तर येईल त्या विद्यार्थिनिस तीन प्रश्न विचारले जात होते. अतिशय गमती जमती मध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला. पुढील विद्यार्थिनिंनी तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत व यशस्वी झाल्या कल्याणी पाटील 8 वी ब, भार्गवी देसले 8 वी ब, उत्कर्षा गुरव 8 वी अ, शिक्षकांमधून गणित शिक्षिका सौ.वैद्य मॅडम यांनी गणित दिवसाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती बोरसे मॅडम यांनी गणिताच्या संकल्पना स्पष्ट केल्या. आपण गणिताची सांगड आपल्या आयुष्याशी घालून यशस्वी होऊ शकतो. विजयी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका, मुख्याध्यापिका व श्रीमती वानखेडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हर्षिका निकम, युक्ती पाटील, हिमानी पवार, प्रांजल कुसुंबे या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रांजल पाटील यांनी मानले. विजयी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे, शालेय समिती अध्यक्ष एस्.जे.शेख, संचालक गुणवंत पाटील व किरण पाटील यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.