उद्धव ठाकरे जर अयोध्येला गेले तर शिवसेनेचा जयजयकार होईल… – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा आहे.

24 प्राईम न्यूज 23 Dec 2023
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर अयोध्येला गेले तर तिथे पुन्हा उद्धव ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला श्रीराम मंदिर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सीहला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत, मात्र उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अद्याप आमंत्रण देण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. कारण त्यात आमचे योगदान आहे. ज्यांचे काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. राम मंदिर ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. यांनी बाळासाहेबांनाही बोलावले नसते. उद्धव ठाकरे अयोध्येत गेले तर तिथे पुन्हा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवमेनया जयजयकार होईल असेही संजय राऊत महणाले,