मराठी वाङ्मय मंडळाच्या पदाधिकारी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न…

अमळनेर/ प्रतिनिधि
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ,३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेरला येथे होत आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या पदाधिकारी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डाँ अविनाश जोशी यांनी मार्गदर्शन केले. संमेलनासाठी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्याचे काम सुरु झाले आहे. संमेलनासाठी आता खूपच कमी कालावधी राहिला आहे. यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आयोजन समितीतील सर्व मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवत संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले.
पुढे बोलताना डॉ जोशी म्हणाले की, संमेलनाच्या निधीसाठी आपल्याला फिरावे लागणार आहे यासाठी पदाधिकारी व समिती प्रमुख यांनी प्रयत्न करावा. सर्व व्यवस्था तयार करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. मैदानाची स्वच्छता व व्यवस्था आठ दिवसांत पुर्ण होणार आहे. ग्रंथ दालन व प्रतिनिधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, निवास व्यवस्था पुरेशी आहे. यावेळी कवी संमेलन, कवीकट्टा, गझल कट्टा, नाटय प्रवेश याबाबत प्रत्येक समिती पदाधिकारी यांनी आढावा दिला. यावेळी यासाठी वाङ्मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डाँ पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी, प्रा श्याम पवार, प्रा सौ शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ एस.ओ. माळी, प्रा. डॉ एस. आर. चौधरी, प्रा. रमेश माने, डॉ कुणाल पवार, शरद पाटील, भाऊसाहेब देशमुख, गुलाबराव पवार यांच्यासह इतर बंधू व महिला मंचाच्या भगिनी उपस्थित होत्या.